सिकलसेल सोसायटी, आयसीएमआर व आरोग्य विभागाचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
तालुका आरोग्य विभाग, सिकलसेल व थॅलेसेमिया सोसायटी, केंद्र शासनाच्या आयसीएमआर आणि समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० जून २०२२ सोमवारला देवाडा प्राथमिक स्वास्थ केंद्रात मोफत आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले. या शिबिरात लहान बाळ, मुले, जेष्ठ पुरुष व महिला, गर्भवती व बाळंतपण झालेल्या महिला, सिकलसेल तपासणी रुग्ण, नेत्र रुग्ण, आशा वर्कर यांचेसह सुमारे ३१८ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आला. या शिबिरात आयसीएमआर चमूने सिकलसेल व थॅलेसेमिया आजाराची तपासणी व रक्ताच्या अन्य तपासणी साठी रक्त नमुने गोळा केले. सकाळी ११ वाजता पासून सुरू झालेले हे शिबिर चार वाजेपर्यंत चालले. या शिबिराला ग्रामीण भागातील लोकांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला.
या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांनी भूषविले. उद्घाटन बालरोग तज्ञ डॉ.संदीप बांबोळे यांनी केले. प्रमुख अतिथी स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रणाली लांजेवार, आयसीएमआर च्या डॉ.अरुणा जवादे, वैद्यकिय अधिकारी डॉ.विपिनकुमार ओदेला, डॉ.माधुरी वैद्य, सिकलसेल सोसायटी सचिव रूपल उराडे, समता फाऊंडेशनचे राहुल मोगरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रकाश नगराळे म्हणाले की, आरोग्याविषयी सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे सतत जनतेच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या सर्वगोष्टींचा फायदा घेत आपले आणि आपल्या परिवाराचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ.नगराळे यांनी केले. बालरोग तज्ञ डॉ. संदिप बांबोडे म्हणाले की, मातांनी जुन्या ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता आरोग्य सेविका अथवा अंगणवाडी सेविका यांच्या सूचनांचे पालन करून गरोदर असताना आणि प्रसूती नंतर योग्य काळजी घेण्याचे सांगितले. यावेळी आपल्या बाळाची काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती डॉ.संदिप बांबोडे यांनी दिली. डॉ.अरुणा जवादे यांनी सिकलसेल आजाराची माहिती देत रुग्णांनी शासन देत असलेल्या मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक सिकलसेल सोसायटीच्या सचिव रूपल उराडे, संचालन अनिल बाळसराफ व आभार प्रदर्शन आरोग्य अधिकारी जयश्री हनवते यांनी केले.
पावसाळ्यात ग्रामीण भागात आरोग्य विषयक विविध समस्या निर्माण होतात. अनेक रुग्ण तपासणीसाठी उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात जाण्याचे टाळतात. अशा रुग्णांच्या सुविधेसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ३५ मुले, ६० गर्भवती महिला, ५५ महिला, ४९ जेष्ठ नागरिक, २४ रुग्णांची नेत्र तपासणी आणि ९५ सिकलसेल तपासणी साठी रक्त संकलन करण्यात आले. नेत्र तपासणी शंकर बुऱ्हाण व किशोर लांजेवार यांनी केली. या शिबिरासाठी समता फाऊंडेशन, मुंबई यांनी मोफत औषधी पुरविली. राजुरा तालुका केमिस्ट असोसिएशनने बाळ व महिलांसाठी प्रोटीन पावडरचे डब्बे उपलब्ध करून दिले. अध्यक्ष डाखरे, प्रकाश चांडक, गजेंद्र झंवर, प्रशांत गोठी तसेच राज पाटील यांनी सहकार्य केले. शिबिरात देवाडा, लक्कडकोट, सिद्धेश्वर, सोंडो, कोष्टाळा, उमरझरा, वरूर रोड, सोनुर्ली, सुमठाणा यासह परिसरातील अनेक गावातील रुग्ण सहभागी झाले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी देवाडा आरोग्य केंद्राच्या डॉ. सोनाली करमनकर, संध्या ठाकरे, गजानन काईट, बाबा चौधरी, अमोल कोटरंगे, प्रिया बनसोडे, माधुरी काळे, रिबेका लोणारे, वासुदेव मडावी, शुभांगी शंभरकर, सिकलसेल सोसायटीचे अरुण उराडे, जयश्री उराडे, देवाडा ग्रामीण रुग्णालयाचे एएनएम जयंती रामटेके, आरोग्य सेवक जागेश प्रधान व बाबा चौधरी, एलएचव्ही श्रीमती मोटघरे, गजानन काईट, संध्या ठाकरे, ट्विंकल खैरे, अमोल कोरांगणे, वासुदेव मडावी, संजय मेश्राम तसेच कल्याण नर्सिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी सहकार्य केले. आयसीएमआर चे निर्भय भदाणी, उमेश ढुमणे, प्रज्योत देशमुख, प्रशिल नंदेश्वर, पूजा लांजेकर, सौरभ कासलकर यांनी रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.