Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा रोगमुक्तीकरिता योग आवश्यक - अँड. वामनराव चटप आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - पतंजली महिला योग ...
आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
रोगमुक्तीकरिता योग आवश्यक - अँड. वामनराव चटप
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
पतंजली महिला योग समिती, किसान सेवा समिती, भारत स्वाभिमान संघटन, युवा युवती संघटन, पतंजली योग समिती, विविध सामाजिक संघटना तथा शिवाजी महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस शिवाजी महाविद्यालयाचा सभागृहात साजरा करण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अँड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, उपविभागीय वनअधिकारी अमोलकुमार गर्कल, डॉ. भाग्यश्री जीभकाटे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष साजिद बियाबानी, डॉ. प्रकाश नगराळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, भाजपा नेते सतीश धोटे, बादल बेले, माजी विध्यार्थी संघ अध्यक्ष अविनाश दोरखंडे विविध शाळा कॉलेज चे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक इत्यादीं मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात प्रथम पुंडलीक उराडे, भारत स्वाभिमान संघटना यांनी योगा चे सूक्ष्म व्यायाम घेतले. त्यानंतर कार्याध्यक्ष हरिभाऊ डोर्लीकर यांनी विविध प्रकारचे आसन घेतले. आरती निकोसे, सौ‌. वनीता उराडे, सौ. सरोज हिवरे, यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक पुंडलिक उराडे यांनी केले तर संचालन प्राध्यापक डॉ. राजेश खेरानीयांनी केले. आभार प्रदर्शन हरिभाऊ डोर्लीकर यांनी मानले. कार्यक्रमास भारत स्वाभिमान संघटनचे‌ सह‌ जिल्हा प्रभारी एम.के. शेलोटे, युवा प्रभारी प्राध्यापक देविदास कूईटे, अँड. मेघा धोटे, अल्का गंगशेट्टीवार, पुष्पा गिरडकर, कृतीका सोनटक्के तसेच किसान सेवा समिती चे सत्यपाल साळवे यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.
योग शिबिराला आर्थिक मदत करणाऱ्या दान दात्यांचा शाल श्रीफल भेंट देऊन सत्कार करण्यात आला. योग समितीवर व्देश भावनेतून सोशल मीडियावर आरोप करून बदनाम करणाऱ्या प्रवृतीचा अँड. चटप यांनी चांगलाच समाचार घेतला व अश्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. आयुष्यात निरोगी राहयचे असेल तर नियमितपणे योग करायला हवा असे प्रतिपादन चटप यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top