Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ८ फूट खोल खड्ड्यात पडलेल्या गाईला वाचविण्यासाठी युवक सरसावले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
८ फूट खोल खड्ड्यात पडलेल्या गाईला वाचविण्यासाठी युवक सरसावले शर्थीचे प्रयत्न करीत गाईला दिले जीवदान युवकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक.... आमच...
८ फूट खोल खड्ड्यात पडलेल्या गाईला वाचविण्यासाठी युवक सरसावले
शर्थीचे प्रयत्न करीत गाईला दिले जीवदान
युवकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक....
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गाय रस्त्याने जात असताना अचानक रस्त्यालगत शौचालयासाठी खोदलेल्या ८ फूट खोल खड्ड्यात गाय कोसळली. गाय खड्ड्यात कोसळताच जीव वाचण्यासाठी गाईने जिवाच्या आकांताने एकच हंबरडा फोडला. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावातील युवकांनी पुढाकार घेत गाईला ८ फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढले. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी लटारी लोहे यांच्या मालकीची गाय रस्त्याने जात असताना अचानक गाय रस्त्यालगत शौचालयासाठी खोदलेल्या ८ फूट खोल खड्ड्यात कोसळली.जीव वाचविण्यासाठी गाईने हंबरडा फोडला.गाईचा हंबरडा ऐकून गावातील नागरिक गोळा झाले. ८ फूट खोल खड्ड्यातून गाईला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी धडपड चालविली. आपापल्या परीने जमेल तेवढे प्रयत्न सुरू झाले. यात युवकांनी पुढाकार घेतला.गाईचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. गाईला ८ फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी  मोठा दोर आणण्यात आला. काहीजण खड्ड्यात उतरले. गाईला ८ फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढणे म्हणजे कसरतीचे काम.मात्र गाईचा जीव वाचला पाहिजे म्हणून गावकरी एकवटले.यात नागरिकांच्या मदतीने युवकांनी पुढाकार घेत गाईला बाहेर काढले.यात खड्ड्यातून गाईला बाहेर काढण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य चेतन बोभाटे, शुभम जुनघरी, रुपेश बोबडे, शंकर मडावी, अनिल मडावी, विकास वाघमारे, विकास पिंपळकर, आकाश गिरी, बादल गिरी, अनिल मादनेलवार, सुधाकर गाजुलवार, ऋषी लांडे या युवकांनी व गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून गाईला ८ फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढले. या युवकांच्या धाडसाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top