Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जनावरे घेऊन जाणारे वाहन १४ चाकी ट्रकवर धडकले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जनावरे घेऊन जाणारे वाहन १४ चाकी ट्रकवर धडकले जनावरांसह दोन इसम गंभीर जखमी डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी वरोरा - जनावरे घेऊन विरुद्ध ...
जनावरे घेऊन जाणारे वाहन १४ चाकी ट्रकवर धडकले
जनावरांसह दोन इसम गंभीर जखमी
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वरोरा -
जनावरे घेऊन विरुद्ध दिशेने जाणारे वाहन समोरून येणाऱ्या वाहनावर धडकले. या अपघातात जनावरांसह दोन इसम गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास नागपूर - चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल नाक्याजवळ घडला. मोहम्मद इमरान मोहम्मद सादिक व शेख इमरान शेख खाजा, रा. मूर्तिजापूर, जि. अकोला हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमएच ३० बीडी ४१८४ क्रमांकाचे वाहन सहा बैल घेऊन मूलवरून वरोराकडे निघाले होते. या वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ४० बीएल ००६३ या १४ चाकी ट्रकला समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी जनावरे असलेल्या पिकअप वाहनाचा चालक - मालक मोहम्मद इमरान मोहम्मद सादिक याच्याविरुद्ध कलम २७९, ३३७ तसेच पाळीव प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याप्रकरणी अधिनियम १९६० नुसार वरोरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे व त्यांचे सहकारी करीत आहेत. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top