Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वरोरा येथे आंतराष्ट्रीय योग दिवस संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरोरा येथे आंतराष्ट्रीय योग दिवस संपन्न डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी वरोरा - आंतराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायायालया...
वरोरा येथे आंतराष्ट्रीय योग दिवस संपन्न
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वरोरा -
आंतराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायायालयाचे प्रागंणात आंतराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता योग मार्गदर्शक म्हणून मंकरद घोटकर, लघुलेखक जिल्हा न्यायालय चंद्रपूर हे उपस्थित होते. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्व समजवून सांगितले. उपस्थित न्यायाधीशवृंद तसेच न्यायालयीन कर्मचारी व अधिवक्तागण यांचे कडून योग करून घेतले. एन.रोकडे सदर कार्यक्रमास ए.जे.फटाले दिवाणी न्यायाधीश (व स्तर) वरोरा, डि.आर. पठाण सहदिवाणी न्यायाधीश (व स्तर) वरोरा, पी. सह दिवाणी न्यायाधीश (क स्तर ) वरोरा, के.के. खोमणे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश (व स्तर) वरोरा तसेच वरोरा तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष एम. एम. देशपांडे, अधिवक्ता व्ही.एस. कुत्तरमारे, कु.पी.एम.कुडे तसेच सरकारी वकील सौ. विदया बुराण व न्यायालयीन कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा न्यायाधीश १ र.ना. बावणनकर यांनी उपस्थितांना दैनंदिन जिवनात योगाचे महत्व विशद करून सांगितले व निरामय आयुष्याकरिता दैनंदिन व्यस्ततेतुन वेळ काढुन नियमित योगासने करण्याचे आवाहन केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top