- अमलनाला बांध परिसरात आढळली 15 मृत जनावरे
- गडचांदुर परिसरात आंतरराज्यीय गोवंश तस्कर सक्रिय असल्याचा अंदाज
- मृत जनावरे पाण्यात गेल्याने आरोग्याला धोका होण्याची भीती
- नागरिकांची सखोल चौकशी करून कारवाही करण्याची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
औद्योगिक नगरी असलेल्या गडचांदूर शहर येथील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसरात मृत जनावरे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत जनावरे कोणी टाकली व का टाकली याची अजून माहिती मिळालेली नाही. गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या मोठा परिसर आहे. या परिसरातून अचानक दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांनी परिसराची पाहणी केली असता अमलनाला धरण प्रकल्प परिसरातील एका खोलगट भागात तब्बल १५ मृत जनावरे फेकून दिल्याचे दिसून आले.
सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ झाले असून केव्हाही पावसाची शक्यता आहे. अशावेळी ते मृत जनावरे नाल्यातील पाण्याने वाहून धरणात जाऊ शकतात. अमल नाला चे पाणी गडचांदूर आणि नांदा पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते अशा स्थितीत मृत जनावरे आढळल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एवढ्या मोठ्या संख्येत मृत जनावरे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, महसूल व पोलीस प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही महिन्यांपासून गोवंश तस्करांच्या आंतरराज्य टोळीने नव्या मार्गाचा वापर सुरू केला. वाहनातून कोंबून नेण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाल्याने तस्करांनी ही जनावरे परिसरातच फेकून दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या आधी ही असल्याच प्रकारे मृत गोवंश हे इसापूर ग्रामपंचायत हद्दीत टाकली गेली होते. स्थानिकांनी विरोध केल्यावर आता मृत जनावरे ही बैलमपुर शिवारात टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गडचांदूर हे आंतर राज्यिय गोवंश तस्करीचे मोठे केंद्र म्हणून उदयास येत असून वाहतूकी दरम्यान मरण पावलेली जनावरे निर्जन स्थळी टाकण्यात येत आहे असा अंदाज व्यक्त होत आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने मृत जनावरे आढळून आले असताना त्याकडे कोणत्याच विभागाचे लक्ष गेले नसेल काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही मृत जनावरे कशानी मृत पावली याची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी स्थानीय नागरिक कडून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.