Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोविड-19 सानुग्रह अनुदान - बँक खात्यात अनुदान प्राप्त न झालेल्या अर्जदारांनी संपर्क करण्याचे आवाहन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोविड-19 सानुग्रह अनुदान - बँक खात्यात अनुदान प्राप्त न झालेल्या अर्जदारांनी संपर्क करण्याचे आवाहन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपू...
  • कोविड-19 सानुग्रह अनुदान - बँक खात्यात अनुदान प्राप्त न झालेल्या अर्जदारांनी संपर्क करण्याचे आवाहन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोविड-19 मुळे मृत पावलेल्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णय प्रसारित केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाद्वारे ऑनलाइन पोर्टल विकसित केले असून याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. यासाठी https://mahacovid19relief.in या लिंकवर अर्ज करता येईल.
तथापि, सदर ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करून अद्यापही ज्या उमेदवारांना रुपये 50 हजार रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही, अशा अर्जदारांनी दि. 16 जून 2022 पर्यंत आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे अप्लीकेशन आयडी व अर्जदाराचे बँक पासबुकच्या प्रतसह संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. दिप्ती सूर्यवंशी यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top