Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मलनिस्सारण गटार योजनेच्या बांधकामातील भ्रष्टाचार विरोधात राजेश बेले यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मलनिस्सारण गटार योजनेच्या बांधकामातील भ्रष्टाचार विरोधात राजेश बेले यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन डी.एस. ख्...
  • मलनिस्सारण गटार योजनेच्या बांधकामातील भ्रष्टाचार विरोधात राजेश बेले यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु
  • जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
नविन चंद्रपूर परिसरातील ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपयांच्या मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी या म्हाडा अंतर्गत कामात निकृष्ठ सामग्री वापरण्यात येत असल्यामुळे बांधकामात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहे. निकृष्ट कामावर पांघरुन घालण्यासाठी भेगा असलेल्या बांधकामाला रंग लावून लिपापोती केल्याचा आरोप बेले यांनी केला. या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
सदर कामाबाबत संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेद्वारे २२ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार करण्यात आली. लेखी तक्रारीच्या अनुषंगाने म्हाडाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांनी दि. २२/४/२०२२ रोजी मौका पाहणी केली व ९ मे २०२२ ला पाहणी अहवाल सादर केला. मात्र, मेनहोलचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप बेले यांनी केला. जवळपास ६० ते ७५ किलोमिटर टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामात शासनाच्या अटी शर्ती व नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आरोपही त्यांनी केला. यावर मात्र काहीही कारवाही होत नसल्याने नाईलाजाने अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात सांगितले. याविषयी उच्चस्तरीय चौकशी करुन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करत मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी बांधकामाची थर्ड पार्टी कडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आदी मागणीसाठी आज ६ जुन पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत अन्नत्याग जनआंदोलनाच्या सुरु राहील असा इशारा बेले यांनी प्रशासनाला दिला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top