Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विरुरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरुरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत एकाच दिवशी दोन मुलासह बारा जणांवर केला हल्ला पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी गावात कोणतीही यंत्रणा ...

  • विरुरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
  • एकाच दिवशी दोन मुलासह बारा जणांवर केला हल्ला
  • पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी गावात कोणतीही यंत्रणा नाही
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर स्टेशन - 
गावात व आपल्या घरी दैनंदिन काम करीत असताना पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी एकाच दिवशी तब्बल बारा जणांवर हल्ला चढवून लचके तोडून जखमी केल्याची घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे घडली. या पिसाळलेला कुत्र्याच्या हल्ल्यात घरीच खेळत असलेल्या दोन लहान मुलांचा समावेश असल्याने गावात कमालीची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. या सर्व जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली येथे हलविण्यात आले. या गंभीर स्थिती ची खबरदारी म्हणून ग्रामपंचायत ला नागरिकांकडून माहिती देण्यात आली मात्र या पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्याची कोणतीही यंत्रणा गावात दाखल झाली नाही त्यामुळे जनतेत ग्राम पंचायत प्रशासन विषयी असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे. 
या संदर्भात ग्राम पंचायत विरुर यांनी पशुसंवर्धन विभागाला रीतसर पत्र पाठवून सदर पिसाळलेला  कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली मात्र अजूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाही होत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top