Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वरूर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरूर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 85 आरोपी अटकेत, चार चाकी वाहनासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी व...

  • वरूर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
  • 85 आरोपी अटकेत, चार चाकी वाहनासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर (स्टे.) -  
परवाना धारक जुगार क्लब वर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या टीमने काल रात्रो अकरा वाजताच्या दरम्यान टाकलेल्या धाडीत 85 आरोपींना अटक करून कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांवर धक्काबुक्की झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे घडली. 
विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरूर रोड येथे परवानगी घेऊन मागील काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरु केला. मात्र नियमबाह्य जुगार चालवित नियमांची पायमल्ली होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुप्त माहिती मिळताच सापळा रचून रात्रो अकरा वाजता धाड टाकण्यात आली. या दरम्यान पळापळी, घाई गर्दीत पोलिसांसोबत धक्कामुक्की झाली त्यामुळे तोटा वेंकटेश, शेर श्रीकांत, श्रीनिवास गंगारेड्डी राहणार मंचेरियाल तेलंगणा या तिघांवर कलम 310, 332, 353 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 85 जणांवर जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून जवळपास 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
वरूर हे गाव तेलंगणा सीमेलगत असल्याने काही जुगार आंबट शौकीन तेलंगणा राज्यातून येऊन जुगार खेळत होते. जुगार अड्ड्या लगत शाळा व मंदिर असल्याने नागरिकांनी विरुर पोलिसांना तक्रार दिली. येथील ठाणेदारांनी जुगार अड्याचा परवाना रद्द व्हावा म्हणून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला होता. सदर कारवाही अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असे सूत्रांनी सांगितले. समोरील तपास विरूर स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण हे करीत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top