- सास्ती - राजुरा मुख्य रस्त्याचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन
- ५ कोटी रुपये निधी च्या विकासकामाला सुरूवात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा तालुक्यातील मौजा सास्ती, धोपटाळा, रामपूर, राजुरा या वेकोलीच्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्याची दुर्दशा दूर करण्यासाठी वेकोली कामगार, स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते, कामगार संघटनाचे पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे मागणी केली होती त्याची दखल घेऊन आमदारांनी पाठपुरावा करून येथे ५ कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला असून आज या कामाचे उद्घाटन करून विकासकामाला सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अभियंता बाजारे, माजी सरपंच राजु पिंपळशेंडे, मंजुषा खंडाळे, राजाराम येल्ला, ग्राप सदस्य जगदिश बुटले, ब्रिजेस जंगिडवार, संगीता हिवराळे, लक्ष्मी चौधरी, अनंता एकडे, प्रभाकर बघेल, संतोष शेन्डे, कोमल पुसाटे, रतन गर्गेलवार, माधव बोढे, हारुण शेख, एकनाथ खडसे, दिलीप मुडपल्लीवार, नागेश मेदार, आर आर यादव, एम के सेलोटे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, क्रिष्णा कूमार, रामचंद्र कूमार, रामराव सिंगाराव, रमेश रणदिवे, विठ्ठल रासेकर, बंडू भोयर, अरूण मोहितकर, श्रिधर रावला, विजय कुडे, दिलीप गिरसावळे, श्रिकांत गोडसेला, गोपाल बुरांडे, पुंडलिक सत्रे, सोमेश्वर सपाट, अशोक मून, भाऊराव इटणकर, सतीश चौधरी, मंगेश बोबडे, अब्बास अली, इंदुताई जांभुळे, के.ए. मांडरे, सुरेंद्र गीते, सुधाकर उईके, श्रिधर पुलीपाका, के समय्या, तिरुपती सातूर, आनंद तोंडरा, सिनु गड्डम, मारोती जुलमे, जान बाबु यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.