शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
श्री माता वासवी कन्यका देवी यांच्या 85व्या प्राणप्रतिस्थापना दिन आणि जन्मोत्सवा निमित्त आर्य वैश्य समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जटपुरा गेट, चंद्रपूर येथ स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
आर्य वैश्य समाजाच्या आराध्य दैवात श्री माता वासवी कन्यका देवी यांच्या प्राणप्रतिस्थापना दिन आणि जन्मोत्सवा निमित्त समाज बांधवांच्या वतीने पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शोभायात्रा जटपुरा गेट येथे पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री माता वासवी कन्यका देवी यांच्या मुर्तीची यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पुजा करण्यात आली. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शित पेयाचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वैशाली मद्दीवार, प्रदीप अल्लुरवार, प्रीतम विरमलवार, प्रीतम बोनगीरवार, प्रथमेश मॅडमवार, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, विश्वजित शहा, विलास सोमलवार, जितेश कुळमेथे, राशिद हुसैन, मुन्ना जोगी, नकुल वासमवार, गौरव जोरगेवार, देवा कुंटा, चंद्रशेखर देशमुख, भाग्यश्री हांडे, शमा काझी, हेमलता पोईनकर वंदना हजारे, अॅड. परमाहंस यादव आदिंची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.