Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: इंद्रजीतच्या शस्त्रक्रियेच्या मदतीला धावून आले कोरपनावासी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इंद्रजीतच्या शस्त्रक्रियेच्या मदतीला धावून आले कोरपनावासी उपचाराकरिता लोकांनी स्वयंस्फूर्तीने जमविले ३८ हजार ८०० रुपये धनराजसिंह शेखावत - आम...

  • इंद्रजीतच्या शस्त्रक्रियेच्या मदतीला धावून आले कोरपनावासी
  • उपचाराकरिता लोकांनी स्वयंस्फूर्तीने जमविले ३८ हजार ८०० रुपये
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना येथील प्रभाग क्रमांक ११ तील रामनगर येथील निवृत्ती डोहे यांचे चिरंजीव इंद्रजीत यांच्या जबड्याची शस्त्रक्रिया सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयात पार पडली. त्याला औषध उपचारासाठी मदत म्हणून रामनगर वासियानी स्वयंपुर्ती ने ३८ हजार ८०० रुपयाची आर्थिक मदत केली.
इंद्रजीत याचा जन्मापासूनच जबडा हा त्वचेला चिपकला होता. त्यामुळे त्याला त्याचा त्रास व्हायचा. त्याला सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला. त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली आहे. दुसरी शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी रामनगर वासियानी एकत्रित येऊन ही मदत सामाजिक कार्यकर्ते सुभाष तुराणकर यांच्या हस्ते त्याची आई माधुरी व आजोबा तुळशीराम डोहे यांना सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी नागपूर विभाग शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक, प्राचार्य संजय ठावरी, विनोद मालेकर, टेंभूर्डे सर, ढपकस सर, रमेश दुर्गे, दादाजी तुराणकर, अनिल कवरासे, मनोहर किनाके, कोडापे सर, संदीप टोगे, कैलाश डोहे, आकाश तुरानकर, माधुरी ठावरी, आशा टेंभूडे, संगीता मालेकर, शोभाताई तुराणकर व सर्व रामनगर वासिय उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top