डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर -
दिनांक ५ मे २२ रोजी फिर्यादी नामे निभा रविंद्रनाथ रॉय वय ५८ वर्ष रा. विना अपार्टमेंट जवळ, प्रगतीनगर, चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन, रामनगर येथे तक्रार दिली की, दिनांक ४ मे २२ रोजी सकाळी ५ वाजता दरम्यान फिर्यादी पती रविद्रनाथ रॉय असे मिळुन मुलगी नामे अनुश्री रॉय हिला भेटण्याकरीता रा. वडसा जि. गडचिरोली येथे गेले असतांना फिर्यादीचे घरी राहणारे किरायदार यांनी फिर्यादीचे पती यास फोन करून तुमचे घराचे लॉक तुटलेले आहे असे सांगितले. फिर्यादी व पती असे वडसा येथुन घरी परत आले येवुन पाहीले असता घराचे आलमारी मधील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे एकुण १ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर अप.क्र. ४४२ / २०२२ कलम ४५४, ४५७, ३८०, भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य बघता पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले व डि.बी. स्टॉफ असे गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट देवुन गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी डी. बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पोलीस स्टेशन हद्दीत रवाना होवुन घटनास्थळाचे आजुबाजुचे परिसातील माहिती तसेच गोपनिय बातमिदाराचे माहिती वरून आरोपी आशिष उर्फ आशु श्रीनिवास रेड्डीमला वय-२२ वर्ष, रा. डिस्पेन्सरी चौक, रयतवारी कॉलनी, चंद्रपुर यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह केल्याची कबुली दिली. त्यावरून नमुद आरोपीकडुन सोन्याच्या दागिन्यांसह एकुण १ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पो. हवा. रजनीकांत पुट्ठावार, पोहवा / ०९ पेतरस सिडाम, मरस्कोले विनोद यादव, किशारे वैरागडे, पुरुषोत्तम चिकाटे, आंनद खरात, निलेश मुडे, पांडुरंग वाघमोडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.