Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: देशातील एकमेव सीता मंदिरात स्वयंसिद्धा सीता पुरस्कार वितरण सोहळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
देशातील एकमेव सीता मंदिरात स्वयंसिद्धा सीता पुरस्कार वितरण सोहळा रावेरी येथे शेतकरी महिला आघाडी व हनुमान ट्रस्टचे आयोजन आमचा विदर्भ - ब्युरो...

  • देशातील एकमेव सीता मंदिरात स्वयंसिद्धा सीता पुरस्कार वितरण सोहळा
  • रावेरी येथे शेतकरी महिला आघाडी व हनुमान ट्रस्टचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी जिर्णोद्धार केलेल्या देशात एकमेव असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील सीता मंदिर परिसरात सीतानवमीच्या पावन पर्वावर दिनांक १० मे २०२२, रोज मंगळवारला दुपारी एक वाजता स्वयंसिध्दा सीता सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्थितीशी व समाजव्यवस्थेशी संघर्ष करून आपल्या पाल्यांना लवकुशा प्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर, समाजातील प्रतिष्ठीत व सन्माननीय नागरीक म्हणून घडवले आहे. अशा कर्तृत्ववान धैयशील मातांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील चार महिलांचा सत्कार होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेतकरी नेते, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप भूषविणार असून प्रमुख अतिथी माजी आमदार सरोजताई काशीकर, महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा प्रज्ञाताई बापट, अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे, सुधीर बिंदू, मधुसुदन हरणे, सतीश दाणी, रावेरी सरपंच राजेश तेलंगे, शेतकरी महिला आघाडीच्या माजी प्रांताध्यक्षा सिमा नरोडे, शैला देशपांडे, गिता खांडेभराड, जयश्री पाटील, अंजली पातुरकर, प्रज्ञा चौधरी, हनुमान देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात आत्मनिर्भरता जोपासणाऱ्या महिलांची यशोगाथा, महिला सक्षमीकरण, समाज निर्भय बनविण्यासाठी महिला आघाडीची भूमिका याविषयी विचारमंथन होणार आहे.
या सोहळ्यात स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने डॉ. जयश्री मुरलीधर खर्चे (मलकापूर, जिल्हा बुलडाणा), श्रीकांतादेवी बद्रीनाथ सारडा (हैदराबाद), जयश्री जयवंत देशपांडे (राजुरा), राधा लक्ष्मीप्रसाद शुक्ला (आर्वी), सुरेखा रमेश वांढरे (चंद्रपूर), मंगला वासुदेव लालसरे (चंदपुर), गुंफा दादाजी चिडे (देवाडा जि.चंद्रपूर), शोभा संजय अमृतकर (रावेरी) आणि मायाताई पंडीत अवघडे (राळेगाव) या नऊ स्वयंसिद्धांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे दोन वर्षानंतर होणाऱ्या या सोहळ्याला महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी महिला आघाडी, हनुमान देवस्थान ट्रस्ट, सितानवमी महिला उत्सव समितीने गावकऱ्यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top