डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
तालुक्यातील अंतूर्ला या गावा लगत असलेले स्नेहा फूडस या ऑईल रिफायनरी कंपनीत 8 मे रोजी सकाळी साडे दहा वाजता एपी 16 /टीक्यू 1555 क्रमांकाच्या ट्रक मध्ये सोयाबीन पावडर भरत असताना उंची वरून खाली पडून गंभीर रित्या जखमी झालेल्या नंदी पेटी बाबू या चाळीस वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र सदर घटनेची माहिती कंपनी तर्फे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला
घटनेची माहिती मिळताच काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर हे दिनांक 9 मे रोजी कार्यकर्त्यांसह कंपनीत गेले असता घटनेची माहिती घेण्यासाठी मोबाईल वरून कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता अपघातग्रस्त इसमावर उपचार सुरू असल्याची खोटी माहिती दिली. वास्तविक घटनेच्या दिवशीच सदर इसमाचा मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे.
गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी स्नेहा कंपनीत विद्युत शॉक लागून एका परप्रांतीय कामगारांचा दुर्देवी रित्या मृत्यू झाला असता सदर मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवून कंपनी अधिकाऱ्यांनी पळ काढला होता.या कंपनीत सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून 80% परप्रांतीय कामगार कामावर घेतले असून त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा न पुरविता त्यांना बंधवा मजुरा सारखी वागणूक दिल्या जात आहे. आज घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस तर्फे कंपनीच्या मुख्य गेटवर जोरदार निर्दर्शने व घोषणाबाजी करण्यात आली.
या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देण्याची मागणी काँग्रेसने केली कंपनी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी घुग्गुस पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले याप्रसंगी रोशन दंतलवार, मोसिम् शेख, रफिक शेख, देव भंडारी, रोहित डाकुर, आरिफ शेख, कपिल गोगला, साहिल सैय्यद, सुनील पाटील, अंकुश सपाटे, बालकिशन कूळसंगे व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.