Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वरूर येथील जुगार क्लबच्या अध्यक्षाची तुरुंगात रवानगी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरूर येथील जुगार क्लबच्या अध्यक्षाची तुरुंगात रवानगी ८५ जुगाऱ्यांची जामिनावर सुटका अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन - ताल...

  • वरूर येथील जुगार क्लबच्या अध्यक्षाची तुरुंगात रवानगी
  • ८५ जुगाऱ्यांची जामिनावर सुटका
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
तालुका मुख्यालयापासून सहा किमी अंतरावर असलेल्या वरूर रोड गावात युथ सोशल क्लबवर पोलिसांनी धाड टाकून १७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत क्लबचा अध्यक्ष व्यंकटेश तोटासह ८५ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. अटकेतील व्यंकटेश यांना न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य ८५ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
वरूर रोड गावात युथ सोशल क्लब हा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. क्लबला परवानगी देताना अटी व शर्तीचे पालन करावे अशी अट टाकण्यात आली होती. रात्री दहा वाजेनंतर क्लब बंद करावा असे नमूद होते. पण घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत क्लब सुरू असल्याची माहिती जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळताच त्यांनी रात्री ११.३० वाजता धाड टाकली. दरम्यान धाडीची कारवाई सुरू असताना पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे व्यंकटेश तोटासह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तोटाला सोमवारी न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top