Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विशेष बैठकीत उपोषणकर्त्यांची दोन पैकी एक मागणी मंजूर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विशेष बैठकीत उपोषणकर्त्यांची दोन पैकी एक मागणी मंजूर दुसरी मागणी पण लवकरच मंजूर करण्याचे नगराध्यक्षा कडून आश्वासन दोन्ही मागण्या मंजूर होतपर...
  • विशेष बैठकीत उपोषणकर्त्यांची दोन पैकी एक मागणी मंजूर
  • दुसरी मागणी पण लवकरच मंजूर करण्याचे नगराध्यक्षा कडून आश्वासन
  • दोन्ही मागण्या मंजूर होतपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार
    बघा व्हिडीओ - काय म्हणाल्या नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
नगर परिषदच्या थकबाकी असलेल्या मालमत्ता कर व पाणीच्या करावर लावण्यात आलेल्या दोन टक्के दंड कमी करणे व पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याकरिता भाजपाचे आमरण अनशन सुरू आहे. त्यासंदर्भात 20 मे ला बोलावण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांची उर्वरित रक्कम लवकरच त्यांना देण्याचा ठराव घेण्यात आल्याची माहिती गडचांदुरच्या नगराध्यक्षा श्रीमती सविता टेकाम यांचे कडून देण्यात आली.
मालमत्ता कर व पाणी करावर शासस्तरावरून आलेल्या आदेशा नंतरच हा निर्णय घेण्यात आला आणि दोन टक्के दंड आकारण्याचा ठराव मागील वर्षी सर्व संमतीने घेण्यात आला होता. परंतु कोरोना काळात लोकांची ढासळली आर्थिक अवस्था व त्याला होंत असलेला विरोध बघता परत विचार करण्याकरिता हा विषय सभेत ठेवला होता. आता शासनाला या बद्दल विचारणा करून लवकरच पुन्हा विशेष सभा बोलवून मालमत्ताकर आणि पाणी करावर लावण्यात आलेला दोन टक्के दंड हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात येईल असे आश्वासन नप अध्यक्षा सविता टेकाम यांनी दिले. सोबतच पंतप्रधान अवास योजनेचा राज्य सरकारकडून पूर्ण पैसे आले आहेत आणि ते वाटप सुद्धा झाले आहे. केंद्र सरकारकडून 1.5 लाखातून फक्त 60 हजार रुपये आले होते ते सुद्धा लाभार्थ्यांना देण्यात आले. आता बाकी रक्कम आलीच नाही तर ती रक्कम लाभार्थ्यांना देणे अजून बाकी आहे. लोकांची मागणी वर सकारात्मक भूमिका घेत आता उर्वरित रक्कम सुद्धा राज्य सरकार कळून आलेल्या फंडातील शिल्लक रकमेतून लवकरच लाभार्थ्यांना देण्याचे ठराव पास करण्यात आले आहे. परंतु जो पर्यंत नप प्रशासन दोन टक्के दंड हटण्याचा ठराव पास करत नाही तोपर्यंत सुरू असलेले उपोषण समाप्त होणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतल्यामुळे सध्यातरी उपोषण कधी संपणार हे सांगणे कठीण झाले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top