Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आयपीएल बुकींवर पोलिसांची धाड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयपीएल बुकींवर पोलिसांची धाड २७ लाख रुपयांचा मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी चंद्र...
आयपीएल बुकींवर पोलिसांची धाड
२७ लाख रुपयांचा मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
सध्या देशात आयपीएल क्रिकेटचा खेळ सुरू आहे. जिल्ह्यात आयपीएल च्या नावावर बुकींकडून युवकांना प्रोलोभन देत त्यांचेकडून पैश्याची पैज लावून हार जितचा जुगाराचा खेळ जोमाने सुरु आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी आयपीएल बुकींवर धाड टाकत त्याच्या मुसक्या आवळत गुन्हा दाखल केला आहे. 
उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा हे दिनांक २० मे रोजी त्यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शासकिय वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना मा.अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी त्यांना कळवीले कि, मौजा घुग्घुस येथील राहणारा पृथ्वीराज घोरपडे हा स्व:ताचे राहते घरी एका खोलीत ५ ते ६ ईसम आयपीएल क्रिकेटच्या खेळावर लोकांकडून मोबाईल फोन वरून पैश्याची पैज लावून हार जितचा जुगाराचा खेळ खेळीत असल्याची मुखबिरदारे गोपनीय माहिती मिळाली आहे. त्याचेवर छापा मारून कायदेशीर कार्यवाही करणे बाबत निर्देशित केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी मा.अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांची टीम व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांची टीम तयार करून अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात घुग्घुस येथे जावुन पुखीराज घोरपडे यांचे घरी आयपीएल क्रिकेटच्या खेळावर लोकांकडुन मोबाईल फोनवरून पैश्याची पैज लावुन हार जितचा जुगाराचा खेळ खेळीत असल्याबाबत पंचा समक्ष छापा टाकुन घर झडती घेतली. या झडतीत एका खोलीत सहा ईसम बसुन होल्ड पेटी मध्ये एकूण २४ नग मोबाईल फोनची जोडणी करून ईतर १२ अॅन्ड्राईड फोन बाजुला सभोवती ठेवुन आयपीएल क्रिकेट मॅचवर लोकांकडुन मोबाईल फोन कॉलींग वरून पैश्याची पैज लावुन हार जितचा जुगाराचा खेळ खेळवित असल्याचे दिसुन आले. याकरिता त्यांनी टाटा स्कॉय रिसीव्हर, वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन हॅन्डसेट असे एकूण ३६ नग, दोन सॅमसंग कंपनीचे टॅब, दोन नग वेगवेगळया कंपनीचे लॅपटॉब, पर्सनल एसी, विद्युत बोर्ड, एक जुना वापरता डाटा केबल, एक जुना वारता चार्जर, एक टाटा स्कॉय रिमोट, एक एलसीडी टिव्ही व त्यांचे रिमोट, २ कोऱ्या कागदावर बोगस सट्टा आकडे लिहीलेले बॉलपेन इत्यादी साहित्य मिळुन आले. नमुद इसमाची अंग झडतीत रोख रक्कम १९५० रुपये तसेच आरोपीनी घटनास्थळी खेळण्याकरिता वापरलेली फॉरच्युनर गाडी क्रमांक एमएच २९ बीसी ५७८६ आणि डस्टरगाडी कमांक एमएच ४८ पी ४१६३ या वाहनासह एकूण २७ लाख ४४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल आढळुन आला. पोलसांनी सदरचा मुददेमाल व आरोपीयांना ताब्यात घेवुन पोस्टे घुग्गुस येथे नमुद आरोपीता विरुध्द कलम ४२०,४६५,४६८,४७१,३४ भादवि सह कलम ४, ५मजुका, कलम २५(ब) भारतीय तार अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top