Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तंबाखू विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तंबाखू विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई पाच लाखाचा मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिध...
  • तंबाखू विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई
  • पाच लाखाचा मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
शरीरास हानीकारक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असतांना आड मार्गाने बंदी घातलेल्या तत्सम पदार्थांची विक्री सुरुच आहे. वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना स्थानिक सुरक्षा नगर येथे राहणारा विजय गायकवाड हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठया प्रमाणावर साठवणु करून राहत्या घरून मारूती ओमनी कार ने अवैधरित्या विक्री करीत असल्याची मुखबिरदारे गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली होती. 
उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी त्या अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील  पोलिसांची एक टीम आणि भद्रावती पोलीस स्टेशनयेथील पोलीस कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करून पंचा समक्ष विजय गायकवाड यांच्या मालकीची मारूती ओमनी कार क्र. एमएच ३४ एए ३११९ ची झडती घेतली असता सदर कार मध्ये सुगंधित तंबाखू मजा १०८ चे ५० ग्राम वजनाचे डब्बे प्रत्येकी बॉक्स मध्ये १० डबे असे एकुन २० खरडयाचे बॉक्स प्रत्येकी बॉक्स २५०० रू प्रमाणे जवळपास ५० हजार रुपये, २) ईगल जेल सुगंधित तंबाखू प्रत्येकी ५०० ग्राम वजनाचे १० डबे प्रत्येकी किंमत एक हजार प्रमाणे एकूण १० हजार रुपये, ३) एका प्लॉस्टीक बॅग मध्ये ईगल हुक्का शिश्या तंबाखू एका पॉकीत मध्ये १० पाउच ४० ग्राम वजनाचे असे एकुन ४ बॅग मध्ये ४० पाउच प्रत्येकी नग एक हजार प्रमाणे एकूण ४० हजार रुपये, ४) एका प्लॉस्टीक चुंगडीत मजा १०८ सुगंधित तंबाखू २०० ग्राम वजनाचे ४० डब्बे प्रमाणे एकूण ७ चुंगडी मध्ये २८० डब्बे प्रत्येकी प्रमाणे एकूण २ लाख ८० हजार ५) एक नायलोन थैली मध्ये मजा १०८ सुगंधित तंबाकु २०० ग्राम वजनाचे एकुन ३२ डब्बे प्रत्येकी डब्बा १००० प्रमाणे एकूण ३२ हजार ६) एक जुनी वापरती मारोती ओमनी कार क्र. एमएच ३४ एए ३११९ किंमत १ लाख असा एकूण ५ लाख १२ हजाराचा मुद्देमाल अवैधरित्या आढळून आल्याने पंचासमक्ष सदरचा मुददेमाल व आरोपीस ताब्यात घेवुन पोस्टे भद्रावती येथे येवुन नमुद आरोपी विरुध्द कलम ३२८,१८८,२७३ भादवि सह कलम ५९ अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत नियम व नियमाने २०११ चे कलम २६(२)(रोमन ४), २६(२)(१), २७(३)(डि), २७(३)(ई), ५९(रोमन ३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top