- वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात सुरक्षेचे तीनतेरा
- पाणी टँकरच्या धडकेत सुरक्षा चौकी उध्वस्त
- दोन कर्मचारी सुदैवाने बचावले
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात सुरक्षेचे तीनतेरा वाजले असून बल्लारपूर क्षेत्रात नेहमी काही ना काही लहान-मोठे अपघात घडत असूनही वेकोलि प्रशासन अश्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात कुचकामी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी खान परिसरात रस्त्यावरील कोळश्याच्या डस्टवर नियंत्रण मिळविण्याकरिता नेहमीप्रमाणे रस्त्यावर पाणी टँकर ने पाणी मारत असतांना खाणीतील सुरक्षा चौकी क्रमांक 2 ला आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास पाणी टँकरने धडक दिल्याने सुरक्षा चौकी पूर्णपणे उध्वस्त झाली. पाणी टँकर क्र. 28035 सुरक्षा चौकीकडे येत असल्याचे निदर्शनास येताच सुरक्षा चौकीतील सुरक्षा कर्मचारी मंगेश बोबडे व रोशन शिंदे यांनी चौकीतून पळ काढला यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली व त्यांना कोणतीही दुखापद झाली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागे दोन-तीन महिन्या पूर्वी अश्याच एका डंपरने वेकोलीच्याच एका इमारतीला धडक दिली होती. त्यात दोन वेकोलि कर्मचाऱ्यांना दुखापद झाली होती. वेकोलि प्रशासनाने कामगारांच्या सुरक्षेविषयी ठोस पावले उचलावी अशी मागणी कामगारांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.