Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चौकीदाराराने केली मारहाण - तरुणाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चौकीदाराराने केली मारहाण - तरुणाचा मृत्यू चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्र परिसरातील घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - चिचपल्ली ...

  • चौकीदाराराने केली मारहाण - तरुणाचा मृत्यू
  • चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्र परिसरातील घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्र परिसरात चौकीदाराने मारहाण केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात आज 5 मे रोजी मृत्यू झाला. प्रेम केशव तावाडे वय 35 वर्षे असे मृतकाचे नाव आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनाटगाव येथील रहिवासी असलेला प्रेम तावाडे हा पत्नीला भेटण्यासाठी 28 एप्रिलला चिचपल्ली येथे आला होता. त्याची पत्नी वनविकास महामंडळात चौकीदार म्हणून कामाला आहे. मात्र, तिथे असलेल्या मनोहर दुर्योधन या चौकीदाराने प्रेम तावाडे यास बांबूने मारहाण केली. यात प्रेम तावाडे हा जबर जखमी झाला. त्याला चंद्रपूर येथील डॉ. पोद्दार यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना आज गुरुवारी मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मनोहर दुर्योधन यांना अटक करण्यात आली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top