Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धावर वाघाचा हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धावर वाघाचा हल्ला वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागभीड - तेंदुपत्ता संकलनाला ग...

  • तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धावर वाघाचा हल्ला
  • वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धाला वाघाने ठार मारल्याची घटना आज दिनांक 05 मे 2022 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत नागभीड वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कोसंबी-गवळी बिटातील कक्ष क्रमांक 742 मध्ये तेंदुपत्ता संकलना करिता गेलेला नवेगाव हुंडेश्वरी येथील आडकू गेडाम वय 65 यांना वाघाने ठार मारल्याची घटना आज घडली.
याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक के. पाटील यांनी घटनास्थळी भेट घेऊन मौका पंचनामा करून शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. सदर प्रकणातील पीडित परिवाराला वन विभागा मार्फत तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक के.आर. धोंडणे, वन परिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, वनरक्षक के.पाटील, क्षेत्र सहाय्यक सय्यद, देवपायली चे वनरक्षक येडमे इत्यादी उपस्थित होते. घटनास्थळी कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत असून वनविभागाने त्या परिसरात गस्त सुरू केलेली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top