विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
माहे रमजानमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या क्रमाने शुक्रवार २९ तारखेला वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराच्या वतीने सामाजिक सौहार्द व एकोपाचे प्रतीक इफ्तार पार्टीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
शुक्रवारी शहरातील विविध मशिदींमध्ये अखेरच्या शुक्रवारची नमाज अदा करून देशासह परिसरात शांतता व समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुशील मडावी, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, महासचिव रविकिरण बावणे, सदानंद मडावी, जिल्हा सचिव रमेश लिंगंपल्लिवार, जिल्हा सदस्य महेंद्र ठाकूर, भगीरथ वाकडे, प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, राहुल अंबादे, धनराज उमरे, तौफिक, अक्रम, असलम, फैजल, असलम चाऊस, प्रवृत्ती फाऊंडेशन अध्यक्ष सूरज भांबरे इत्यादी कार्यकर्ता व मस्जिद कमिटीच्या सदस्यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.