- महाराष्ट्र/कामगार दिनी सरपंच हरिदास झाडे यांच्या पुढाकाराने
- खामोना येथे दिव्यांगांना ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून अनुदान वाटप
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त दिव्यांग व्यक्तींना जीवनाच्या सर्वांगीन समान संधी उपलब्ध व्हाव्यात, दिव्यांगांना संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शासन स्तरावरून समाज कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांगां करिता योजना तर भरपूर आहेत मात्र अंमलबजावणी करण्याकरिता पुढाकार घ्यावा लागतो महाराष्ट्र/कामगार दिनी खामोना-माथरा गट ग्राम पंचायतीचे सरपंच हरिदास झाडे यांनी ग्रामपंचायत स्वउत्पन्नातील ५ टक्के निधीची अंमलबजावणी करत ग्रापं हद्दीतील १४ जणांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचे अनुदान वाटप केले.
आज १ मे गट ग्रामपंचायत खामोना येते महाराष्ट्र निर्माण दिन तसेच कामगार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच हरिदास झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर
कवडू सातपुते, सुरेश पिंपळशेंडे, राहुल बुटले, सुमन पोटे, नामदेव लोणारे, संतोष चेन्नुरवार, अमृत गिरसावळे, वैष्णवी झाडे, रेखा झाडे, सलोनी भोयर, अरुण सिडाम यांना प्रत्येकी दोन रुपये अनुदान चेक चे वाटप सरपंच हरिदास झाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच हरिदास झाडे यांनी “योजना सहाय्याचा, वाटा विकासाचा” असा निर्धार घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ कश्याप्रकारे मिळविता येईल. अनुसूचित जाती वर्गाला त्यांच्या योजनांची माहिती दिली.
यावेळी उपसरपंच शारदा तलांडे, ग्रापं सदस्य मारोती चन्ने, कवडू सातपुते, सौ.सोनी ठक, सौ.अल्का वैद्य, सौ.लक्ष्मी लोणारे, ग्रामसेवक विनोद केवे, ग्रापं कर्मचारी साईनाथ लोणारे, संजय बुटले, जिप शाळेचे मुख्याध्यापक धनवलकर सर व इतर शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका अंजू नक्कावार, पोलीस पाटील विजय पादे, तंटामुक्ती अध्यक्ष गजेंद्र मोरे, आशा सेविका सविता उरकुडे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.