Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गावालगत अज्ञात इसमांनी लावली आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गावालगत अज्ञात इसमांनी लावली आग आगीमुळे जनावरांसाठी ठेवलेलं तनसी चे ढिग, लाकडे व पाईप जळून खाक कहाली येथील गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हा...

  • गावालगत अज्ञात इसमांनी लावली आग
  • आगीमुळे जनावरांसाठी ठेवलेलं तनसी चे ढिग, लाकडे व पाईप जळून खाक
  • कहाली येथील गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
ब्रम्हपुरी -
ब्रम्हपुरी तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या कहाली गावाजवळ अचानक दुपारच्या वेळेस अज्ञात व्यक्तींनी शेतात आग लावली. ही आग कहाली गावापर्यंत आली. गावातील नागरिकांना आग गावात येताना दिसताच आरडाओरडा सुरू केले. गावातील प्रत्येक नागरिक आग विझविण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण आग काही आटोक्यात येत नव्हती. लगेच ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन व गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आली. या आगीमुळे अनेक गावकऱ्यांचे जनावरांची तनसी चे ढिग, लाकडे व पाईप जळून खाक झाले असुन गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top