- 25 दिवसीय निःशुल्क आजारानुसार योग प्राणायाम शिबीर व सह योगशिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
- भवानी माता मंदिराच्या परिसरात 2 मे पासून सुरुवात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
पतंजलि योगपीठ हरिद्वार द्वारे संचालित पतंजलि योग समिती, भारत स्वाभिमान सेवा ट्रस्ट, महिला पतंजली योग समिती, किसान सेवा योग समिती, युवा-युवती योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भवानी मंदिर राजुरा येथे सोमवार 2 मे पासून 25 दिवसीय निःशुल्क आजारानुसार योग्य प्राणायाम शिबीर व सह योगशिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबीर 2 मे पासून सुरु होणार असून 25 मे ला शिबिराचे समापन होणार आहे. या शिबिरात आजारानुसार योग प्राणायाम व आयुर्वेदिक चिकित्सा यावर पतंजलि योग पीठ हरिद्वार चे योग तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अँड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, अँड. संजय धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी जिप सभापती अविनाश जाधव, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, अँड. अरुण धोटे हे उपस्थित राहणार असून या शिबिरात योगपीठच्या प्रांतीय प्रमुख पदाधिकारी योग प्रचारक सौ. संजीवनी माने, माजी महाराष्ट्र महिला योग समितीच्या प्रभारी श्रीमती शोभाताई भांगीया, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी भगवान पालकर, भारत स्वाभिमान ट्रस्ट चे जिल्हा प्रभारी विजय चंदावार, महिला पतंजलि योग समितीच्या प्रभारी स्मीता रेबनकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
ज्यांना निव्वळ योग करायचा आहे त्यांचा करिता हे शिबीर निःशुल्क असून मात्र ज्यांना सह योगशिक्षकाचे प्रमाणपत्र पाहिजे असल्यास अश्यांकरिता 1099/- सहयोग प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार आहे. परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या आजारानुसार योग प्राणायाम शिबीर व सह योगशिक्षक प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.