आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते तहसील कार्यालय राजुरा येथे आज दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थितांना आणि क्षेत्रातील समस्त जनतेला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, नायब तहसिलदार अतुल गांगुर्डे, पोलिस निरिक्षक बहादूरे, मुख्यधिकरी सूर्यकांत पिदुरकर, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, माजी जि.प. सदस्य मेघा नलगे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद सकावत अली, माजी नगसेवक गजानन भटारकर, हरजितसिंग संधू, जयपूरकर, ॲड चन्द्रशेखर चांदेकर, अजय बतकमवार, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीवृंद आणि नागरिक उपस्थिती होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.