- पक्ष्यांचा निवारा संकटात
- उन्हाळ्यात पाणी पाजुन पक्ष्यांचा जीव वाचवा
- पक्ष्यांसाठी घराबाहेर ठेवा जलपात्र
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वाढत्या उन्हामुळे पशुपक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. आजच्या डिजिटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहे. परिणामी पशुपक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. विशेष म्हणजे यंदाचा उन्हाळा कडक असल्याने मुक्या पशु पक्ष्यांचा प्राण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या पशु पक्ष्यांसाठी या उन्हाळ्यात घराच्या अंगणात, गॅलरीत अथवा छतावर जिथे पुरेशी सावली असेल तिथे लहानसे पाण्याचे पात्र ठेवा व उन्हाळ्यात पाणी पाजुन पक्ष्यांचा जीव वाचवावे. या उन्हाळ्यात वन्यजीवांच्या चारापाण्याची सोय करणे, पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. विशेष म्हणजे पक्ष्यांसाठी ते अत्यंत गरजेचे झाले आहे. कारण हे पक्षी घरी सकाळी दाराबाहेर किलबिल करतांना ऐकायला मिळतात, त्यामुळे त्यांच्यासाठी घरी पाणी पात्र ठेवल्याचे हे त्याच्यासाठी उपयुक्त व सोयीचे होणार आहे. सध्या वाढत्या सिमेंटच्या जंगलाने निसर्गावर अतिक्रमण वाढले आहे. जंगलातील झाडे कमी होत चालली आहे. तसेच गावशिवारेही कमी होताना दिसून येत आहे. वाढत चाललेले उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे-झुडुपे, दुर्मिळ व आटत चाललेले पाणीसाठे यामुळे वन्य पशू-पक्षी यांना जगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
याबद्दल उपक्रम राबविणे गरजेचे
पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा असा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरू लागला आहे. हा संदेश बोटावर मोजण्याइतकेच नागरिक मनावर घेतात व पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक पक्षी जीव गमावतात. यामुळे पशू-पक्षी कमी होऊ लागले आहे. शासनाने ठरवून दिलेले चिमणी दिन, पर्यावरण दिन, जल दिन, यासह अनेक दिन शाळा, महाविद्यालय, अनेक सामाजिक संघटना पक्ष्यांना चारा-पाणी देऊन हे दिन साजरे करताना दिसून येतात व त्यांना भरभरून प्रतिसादही मिळतो. एक दिवस जागृती केल्याने पशू-पक्षी बचावणार नाही. त्यामुळे या उन्हाळाभर असे उपक्रम करणे गरजेचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.