Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मधून समाज घडला - डॉ.मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मधून समाज घडला - डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती दिना निमित्त अभ...

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मधून समाज घडला - डॉ.मंगेश गुलवाडे
  • भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती दिना निमित्त अभिवादन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीताच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण केली त्यामध्ये ग्रामोदय, राष्ट्रनिर्माण, अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक सुधारणांतून लोकशिक्षण अशा विविध सामाजिक प्रश्नांवर सुधारणा घडवून आणली त्यांचे हे कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर अभिवादन प्रसंगी महामंत्री ब्रिजभुषन पाझारे, रवींद्र गुरणुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारने, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ. दीपक भट्टाचार्य, महानगर सचिव राकेश बोमनवार, संतोष जिल्हेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top