Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शहराच्या मध्यभागी असलेले वीज कंपनीचे कार्यालय पूर्ववत सुरू करा - राष्ट्रीय काँग्रेसची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शहराच्या मध्यभागी असलेले वीज कंपनीचे कार्यालय पूर्ववत सुरू करा -  राष्ट्रीय काँग्रेस ची मागणी डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रति...
  • शहराच्या मध्यभागी असलेले वीज कंपनीचे कार्यालय पूर्ववत सुरू करा - राष्ट्रीय काँग्रेस ची मागणी
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी
बल्लारपूर -
बालाजी वार्डातील म.रा.वि.वि. कंपनीचे कनिष्ठ अभियंता चे कार्यालया पूर्ववत सुरू करण्याची मागणी बल्लारपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम यांनी उप मुख्य कार्यकारी अभियंता यांना एक निवेदनाद्वारे केली आहे. 
शहराच्या अगदी मध्यभागी गेली कित्येक वर्षापासुन बालाजी वार्डात कंपनीचे कनिष्ठ अभियंताचे कार्यालय कार्यरत होते. या कार्यालयाच्या माध्यमातुन तक्रार निवारण, नविन कनेक्शन व विद्युत बिलाचा भरणा इत्यादी कामे केल्या जात होती. सदर कार्यालय शहरात मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्व नागरिकांसाठी सोईचे होते. परंतु अचानक विद्युत विभागाने सदर कार्यालय दि. ९ मे २०२२ पासुन शहराच्या बाहेर आपल्या सबस्टेशन मध्ये हलवले आहे. ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. कारण सदर कार्यालयाच्या माध्यमातुन होणाऱ्या कामाकरिता नागरिकांना नाहक पायपीट करावी लागत आहे. रात्री किंवा अपरात्री या कार्यालयाकडे जाणे सुध्दा त्रासदायक आहे. कोणतेही कार्यालय नागरिकांच्या सोईनुसारच असले पाहीजे, असे निवेदनात नमूद करण्यात आले असून, या मागणीचा सहानुभूतिपुर्वक विचार करुन नागरिकांच्या हितामध्ये जुने कार्यालय पुर्ववत सुरु करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. नागरिकांना होणारा त्रास बघता ही ज्वलंत समस्या समजुन तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या हिताकरिता शहर कांग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी बल्लारपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल करीम, काँग्रेस चे जेष्ठ नेते घनश्याम मूलचंदाणी, एड. मेघा भाले उपस्थित होते.  
या निवेदनाच्या प्रतिलिपी उर्जामंत्री, महाराष्ट्र शासन, पालकमंत्री, महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top