Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अज्ञात इसमाचा कुचलेल्या अवस्थेत प्रेत आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अज्ञात इसमाचा कुचलेल्या अवस्थेत प्रेत आढळला आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागभीड - नागभीड तालुक्यापासुन १२ किमी अंतरावर असलेल्या कोरंबी या ...
  • अज्ञात इसमाचा कुचलेल्या अवस्थेत प्रेत आढळला
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
नागभीड तालुक्यापासुन १२ किमी अंतरावर असलेल्या कोरंबी या गावातील जंगलात एका अज्ञात इसमाचे प्रेत आढळुन आल्याची घटना उघडीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोरंबी या गावातील बाळा आडे हा तेंडुपता तोडण्यासाठी सोमवारी सकाळी कोरंबीच्या जंगलात गेला होता. तिथे त्याला कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचे प्रेत दिसुन आले. ही घटना बाळा आळे याने गावातील भोजराज इरपाते यांना सांगितले असता त्यांनी या घटनेची माहीती नागभीड पोलिस स्टेशनला दिली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव कोडवते करीत आहेत.
पोलीस सूत्रानुसार मृतकाचे वर्णन, अंगात काळ्या रंगाचा फुलपॅंट, पिवळसर रंगाचा काळ्या लाइनिंगचा शर्ट, कोटबांडी घातलेला असुन पॅंटचे खिशात लाल कपडा, 20 रु.ची नोट, 1,1 रुपयाचे 2 नाणे असे ऐकुण 22 रुपये, ब्रिस्टाल पाकीट, पारलेजी बिस्किट पुडा, तसेच मृतकचे बाजुला पिवळसर रंगाचा  दुपट्टा मिळुन आला आहे. ऊंची अंदाजे 5 फुट 3 ईंच. असून मृतकचे गळ्यात लाल धाग्यात 2 रुद्राक्षचे मणी घातलेला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top