Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोवरी सोसायटीवर शिवसेनाचा झेंडा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोवरी सोसायटीवर शिवसेनाचा झेंडा शिवसेनेचे नागेश्वर ठेंगणे अध्यक्षपदी संघटनेचे रामदास जीवतोडे उपाध्यक्षपदी विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रत...
  • गोवरी सोसायटीवर शिवसेनाचा झेंडा
  • शिवसेनेचे नागेश्वर ठेंगणे अध्यक्षपदी
  • संघटनेचे रामदास जीवतोडे उपाध्यक्षपदी
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
गोवरी सहकारी सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून राजुरा तालुक्यात पहल्यांदाच शिवसेनेने सहकार क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने संघटनेशी सोयरीक करून 8 मतांनी विजय मिळविला. शिवसेनेचे नागेश्वर ठेंगणे हे अध्यक्षपदी तर संघटनेचे रामदास जीवतोडे यांची उपाध्यक्ष पदी विराजमान झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात, शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढण्यात आली होती. सहकार क्षेत्रात इतिहासात पहल्यांदा तालुक्यात शिवसेनेला सत्ता मिळविण्यात यश आले आहे. 
या निवडणुकीत शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांनी विशेष लक्ष देत यश संपादन करण्यातसाठी महत्वाची भूमिका बजावली. शिवसेनेच्या वतीने सर्व प्रतिनिधिचे अभिनंदन करण्यात येत आहे. विजयी उमेदवाराला शुभेच्छा देते वेळी सदाशिव उरकुडे, अविनाश जेणेकर, बाळू वणकर आणि नागरिक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top