- भंगाराची दुकाने स्थानांतरीत करण्यासाठी नागरिकांची आ. मुनगंटीवारांकडे धाव
- आ. मुनगंटीवारांचे मनपा प्रशासनाला पत्र
- महानगर भाजपाचे शिष्टमंडळ भेटले आयुक्तांना
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर शहरातील पंचशिल वार्ड, बजाज शिवनकला ते चांदणी चौक परिसरात असलेल्या अवैध भंगार व्यावसायिकांना रहिवासी वस्तीतुन हटवून अन्यत्र स्थानांतरित करा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नागरिकांच्या या मागणीवर यथायोग्य कारवाई करून त्याची माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार एका पत्राद्वारे मनपाला दिल्या आहेत. या संदर्भातील आ.सुधीर मुनगंटीवार यांचे ते पत्र भाजपाच्या शिष्टमंडळाने मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांना दिले असून मनपा प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. या शिष्टमंडळात महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, दत्तप्रसन्न महादाणी, मोनिशा महाताव, राकेश बोमनवार, अमित निरंजने, मनीष खापरे, सैनिष महातव, भावराव पेलणे, रोशन उसरे, विवेक मधुमटके, प्रिय जित यांची उपस्थिती होती.
घुटकाळा वार्ड निवासी व इतर नागरिकांनी अनिश महातव व अन्य नागरिकांनी शहरातील पंचशिल वार्ड, बजाज शिवनकला ते चांदणी चौक या परिसरात अवैध भंगाराचे दुकाने असल्याची तक्रार आ. मुनगंटीवार यांचे कडे केली. सदर भंगाराच्या दुकानात गाळया व इतर कटींगचे काम गॅस सिलेंडरद्वारे करण्यात येत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. सदर भंगाराची दुकाने रहिवासी भागात असून गुंड प्रवृत्तीचे व व्यसनाधीन व्यक्ती येथे येत असल्यामुळे त्याचा मुलांवर सुध्दा वाईट परिणाम होत आहे. या परिसरात वृक्षारोपण केलेले झाडे भंगार व्यावसायिकांनी कापुन ट्रिगार्ड नेत असल्यामुळे पर्यावरणास सुध्दा धोका निर्माण झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.