- रोकड रक्कम जबरीने हिसकावुण नेणारे गुन्हेगार पोलीसांच्या जाळ्यात
- व्यापाऱ्याकडून हिसकावली होती 1 लाख 78 हजार रुपयाची बॅग
- चोरीस गेलेला माल हस्तगत
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी गुरूदास मानकर वय 58 रा. सिस्टर कॉलनी चंद्रपूर यांनी तकार दिली की ते नेहमीप्रमाने दुपारी 4 वाजता दरम्यान सुलभ प्रोव्हिजन्स या दुकानातुन मालक रामजीवन परमार यांचे याचे व्यवहाराचे 1 लाख 78 हजार रुपये घेऊन पंजाब नॅशनल बँक येथे भरण्यासाठी जात असतांना बेंगलोर बेकरी समोर मुस्तफा फर्निचरच्या बाजुला दोन अनोळखी दुचाकी चालकाने मागुन येवुन हातातील पैशाची पिशवी जबरीने हिसकावुन घेवुन गेले. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात अपराध क्रं. 220/2022 कलम 392,34 भादवि चा गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी तपास सुरू केला. रेकार्डवरील गुन्हेगार यांची कसुन चौकशी केली. रस्त्यावरील सिसिटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले मात्र गुन्हा उघडकीस येण्याची शाश्वती दिसत नव्हती. फिर्यादी याने आरोपीतांचा चेहरा झाकुन असल्याचे व फक्त घातलेले कपडे आणि अंदाजे वयबाबत माहीती होती. तेव्हा सुलभ प्रोव्हिजन येथील नौकर रूपेश लांडगे रा. बगड खिडकी, चंद्रपुर याचेवर संशयाची सुई फिरली. त्याचा पत्ता काढून त्याच्या हालचालीवर पाइत ठेवून त्याला ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता, त्याने आरोपी नामे ताज अमान कुरेशी व रितीक प्रभाकर चालकोंडावार यांचे सोबत दोन दिवसापासुन कट रचला व दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी रूपेश लांडगे यानी सांगितल्याप्रमाणे ताज कुरेशी व रितीक वालकोडावार यांनी ज्युपीटर दुचाकीने फिर्यादीचा पाठलाग करित बेंगलोर अकरी जवळ मुस्तफा फर्निचरच्या बाजुला गाठुन फिर्यादीचे हातातील पैशाची पिशवी जबरीने चोरून फरार झाले व ते बगड खिडकी वार्डात राहतात असे सांगितले वरून सपोनि जयप्रकाश निर्मल यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकातील पो. हया. शरिफ शेख, विलास निकोडे, महेंद्र येसरकर, नापोशी जयंता चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, पोशी इम्रान खान मपोशी सजिवनी दराडे अशी चमु घेवुन बगड खिडकी येथे जावुन सापळा रचुन आरोपी ताज अमान कुरेशी याला ताब्यात घेतले. व कसुन विचारपुस केली असता, त्याने आरोपी रूपेश लांडगे यांनी सांगितलेली हकिकत प्रमाणेच कबुली दिली. तसेच गुन्हयातील फिर्यादीकडुन जबरीने हिसकावुन नेलेली रक्कम आरोपीतांन कडुन हस्तगत करण्यात आली. तसेच आरोपी यांनी गुन्हा करण्याकरिता वापरलेली ज्युपिटर दुचाकी सुध्दा मुख्य आरोपी ताज याचे कडुन जप्त करण्यात आले. तिसरा आरोपी नामे रितीक प्रभाकर बालकोडावार याला सुध्दा सापळा रचुन त्याचे घरून ताब्यात घेतले. सदर निती आरोपीवांनी संगतमंरा करून जबरी चोरी करण्याचा कट रचल्यामुळे पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला असुन । तपास पुढे सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात सपोनि जयप्रकाश निर्मल व गुन्हे शोध पथकातील पो. हवा शरिफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, नापोशी जयंता चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर पोशी इमरान खान, मपोशी संजिवनी दराडे पोस्टे चंद्रपुर शहर यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.