- देशी दारू दुकाना समोर दारुड्याने घातली एकच धुमाकूळ
- गडचांदुर येथीलपरवाना धारक देशी दारू दुकाना समोरील घटना
- दारूच्या नशेत तुडुंब झालेल्या व्यक्तीला मारहाण करून त्याचे हातपाय दोरीने बांधल्याचे व्हिडिओ व्हायरल
- बघा व्हिडीओ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
गडचांदुर येथील अचानक चौकात असलेल्या परवाना धारक देशी दारू दुकाना समोर एका दारुड्याने पैशाच्या वादावरून एकच धुमाकूळ घातले. दारूच्या नशेत तुडुंब झालेल्या व्यक्तीला मारहाण करून त्याचे दोरीने हातपाय बांधल्याचे व्हिडिओ सामोरं आले आहे. काही दिवसापूर्वी एक्सपायरी बिअर विक्रीच्या प्रकारानंतर आता हे नवीन व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचांदुर येथील पोलिस स्टेशनच्या 100 मीटर अंतरावर असलेल्या अचानक चौकातील परवाना धारक यांच्या देशी दारूच्या दुकानात दारू दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकात पैश्याच्या वादातून ही खटपट झाल्याचे सांगितले जात आहे. या देशी दारू दुकानात सरकार मान्य दरापेक्षा जास्त दराने दारू विक्री केली जात असल्याने नेहमीच असले वाद कर्मचारी आणि ग्राहकांत होत असतात. भर दिवसा शेकडो लोकापुढे दुकानाबाहेर रस्त्यावर झालेली ही खटपट ही पैशाच्या कारणामुळे झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक लोकांनी याचे व्हिडिओ काढले. शासन ठरवून दिलेल्या दराप्रमाणे दारूची विक्री व्हायला हवी असते, पण इथे दुकानात असे होताना तरी दिसत नाही.
नियमाप्रमाणे शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दराने परवानाधारकांनी दारूची विक्री केल्यास मोठा दंड आकारण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिकार आहे. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भ्रष्ट अधिकारी आणि परवानाधारक यांच्यात आर्थिक मैत्री मुळे अनेक ठिकाणी असे प्रकार घडताना दिसत आहे. प्रत्येक दारू दुकानाच्या दर्शनी भागात दारूची विक्री कोणत्या दराने व्हायला हवी याचे दर पत्रक दर्शनी भागात लागायला पाहिजे. तसेच कोणतीही तक्रार असल्यास संबंधित अधिकर्यांचे नांव, मुद्दा कार्यालयीन पत्ता, मोबाईल क्रमांक हे लावायलाच हवे. त्यामुळे परवानाधारक जादा दराने विक्री करून ग्राहकांची होत असलेली लूट थांबेल व जादा दराने विक्री करणाऱ्या परवाना धारकांवर वचक सुद्धा राहील. परंतु मुळात असे काहीच होत नाही.
मागील काही महिन्यापूर्वी गडचांदूर शहरातील सर्व देशी दारूची दुकाने शहराच्या बाहेर हलविण्यात यावे अशी मागणी पत्रकार संघ व विविध संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला करण्यात आली होती परंतु त्यानंतर या मागणीला केराची टोपली दाखवत उत्पादन शुल्क विभागा चे अधिकार्यानी आतापर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. गडचांदूरातील काही मोठे राजकारणी नेत्यांनी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारू व्यवसायकांशी हाथ मिळवणी करून लोकांच्या मागणीकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी दारू व्यवसायका कडून जास्त दराने दारू विकण्याच्या होत असलेल्या गैरप्रकार रोखूले पाहिजे. राज्य उत्पादन शुल्क विभागा च्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरकांकडून होत आहे.
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या व गटांमूळे महिला बचतगटांच्च्या महिलांचे याठिकाणी मोठ्या प्रमाणात येणे-जाणे असते, तसेच शाळकरी मुलींची ये-जा असलेल्या शेंद्रे यांच्या दारू दुकान पाशी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण राहिल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गडचांदूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सत्यजित आमले शांत व सुव्यवस्थेच्या विचार करून उपद्व्याप माजविणाऱ्या दारुड्यांवर काही अनुचित प्रकार घडण्पूयार्वी परवाना धारक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा गडचांदूर येथील सर्व सामान्य माणूस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.