Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गावाजवळ उभा असलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळविला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गावाजवळ उभा असलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळविला डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - पाटाळा गावाजवळ उभा असलेला ट्रक क्रमांक एमए...

  • गावाजवळ उभा असलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळविला
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
पाटाळा गावाजवळ उभा असलेला ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 3055 अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक 5 मे ला 1 वाजताच्या सुमारास ट्रक चालकाने ट्रक चोरी गेल्याचे ट्रक मालकाला सांगितले. सदर ट्रक चिमूर मार्गे पवनी-कांपा येथून नागपुरकडे गेला असल्याची माहिती ट्रक चालकानी दिली. ट्रक मालक अक्षय पंदीलवार यांनी माजरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. माजरी परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. या आठवड्यात माजरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून ट्रक चोरी झाल्याची दूसरी घटना घडली आहे. या दोन्ही घटनेचा तपास माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिदास चोपणे, प्रदीप पाटील, गजानन जुमडे, अमोल रामटेके, अनिल बैठा, अतुल गुरनुले, गुरू शिंदे व आकाश चेन्नूरवार हे करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top