Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पडोली चौकात त्वरीत ट्राफिक सिग्नल बसवा – आ.सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पडोली चौकात त्वरीत ट्राफिक सिग्नल बसवा – आ.सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश पडोली चौकाचे सौंदर्यीकरण करणार माजी सैनिक मनोज ठेंगणे यांचे उपोषण ...

  • पडोली चौकात त्वरीत ट्राफिक सिग्नल बसवा – आ.सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
  • पडोली चौकाचे सौंदर्यीकरण करणार
  • माजी सैनिक मनोज ठेंगणे यांचे उपोषण मागे
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
पडोली चौकात वाहतुक नियंत्रणासाठी ट्राफिक सिग्नल बसवावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेले माजी सैनिक मनोज ठेंगणे यांचे उपोषण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सोडविले. 
दि. ६ मे २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या सहकार्यांसह मनोज ठेंगणे यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. आपल्या मागणीची तीव्रता मनोज ठेंगणे यांनी आ. मुनगंटीवारांना सांगीतली आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत याबाबत सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभीयंता कुंभे यांना ट्राफिक सिग्नल बसविण्याचे निर्देश दिले. येत्या काही दिवसात पडोली येथील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आ. सुधीर मुनगंटीवार हे वचनाला जागणारे नेते आहेत. दिलेली आश्वासने ते तात्काळ पूर्ण करतील याचा आपल्याला विश्वास असल्याचे माजी सैनिक मनोज ठेंगणे म्हणाले त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. 
यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह, नामदेव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्रि,‍ अनील डोंगरे प्रदेश सचिव युवा मोर्चा, हनुमान काकडे तालुका अध्यक्ष भाजपा, विजय आगडे, विनोद खडसे,‍ अनीता भोयर, किरणताई बुटले, राजेश कुबेर, अजय चालेकर, मोनु ठाकुर, अंजु ठेंगणे, श्रीकांत देशमुख, रणजित डवरे, समीर लाथे, राजीव वाढई, विष्णू वरभे, सिकंदर यादव, दुर्गा बावणे, मोहम्मद अब्बास, राकेश बोरीकर हे ‍उपस्थीत होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top