Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बेलदार व तत्सम समाज राज्यस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बेलदार व तत्सम समाज राज्यस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा सोबतच समाजाचे १८वें दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन वर्धा शाखेचे आयोजन आमचा विदर्भ - ब्...

  • बेलदार व तत्सम समाज राज्यस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा
  • सोबतच समाजाचे १८वें दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन
  • वर्धा शाखेचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना मुख्यालय चंद्रपूर, जिल्हा शाखा वर्धा द्वारे बेलदार व तत्सम समाजाचे १८ वे राज्यस्तरीय अधिवेशन उपवर- वधू परिचय मेळावा व या प्रसंगी विवाह सोहळा तसेच दोनदिवसीय मेळाव्यात महिला व बालक, युवकांचे संस्कृतिक कार्यक्रम, फॅशन स्पर्धेचे आयोजन सरोज मंगलंम वातानुकूलित हॉल, सानेवाडी वर्धा येथे दिनांक ७ व ८ मे ला आयोजित करण्यात आले आहे. 
दिनांक ७ मे ला सायंकाळी ५ वाजता एकल नृत्य स्पर्धा, फॅशन शो स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा चे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.डॉ. शिप्रा कासटवार यशवंत विधी महाविद्यालय वर्धा, सौ.अरुणाताई अ. कोटेवार वर्धा जिल्हा महिला अध्यक्षा, डॉ. वैशाली मुत्यालवार, प्राचार्या महात्मा गांधी आयुर्वेद महविद्यालय सालोड जिल्हा वर्धा व विविध महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे उपस्थितीत व विदर्भातून विविध जिल्ह्यातील स्पर्धा सहभागाने संपन्न होणार आहे.
दुसरे दिवशी दिनांक ८ मे ला सकाळी १० वाजता राज्यस्तरीय अधिवेशन व उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गोपाल नारळवार, वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय पूलगाव, जिल्हा वर्धा यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार, विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना प्रांतीय अध्यक्ष चंद्रशेखर कोटेवार, वर्धा  जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार, वर्धा पंस सदस्य प्रफुल कुचेवार, बेलदार समाज संघर्ष समिति महाराष्ट्र प्रदेश  संघटन प्रमूख  व संघटक संघर्षवाहिनी नागपूर चे राजेंद्र बधीये, जी.बी.एम.एक. कनिष्ठ महाविद्यालय हिंघणघाटचे प्रा. सुमित येलपुरवार, झी लर्नलिमिटेड मुंबई क्षेत्रीय पव्यवस्थापक विलास कार्लेकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार नाशिक, सौ. प्रभाताई चिलके चंद्रपूर इत्यादी प्रमूख पाहुण्याचे उपस्थितीत समाजातील श्रीमती कमलाबाई बालुजी चेलमेलवार यांचे चि. संदिप आणि श्रीमती छायाताई दिलीपराव कारडवार यांची कन्या अंजली यांचे सामूहिक विवाह सोहळा संपन्न होऊन अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. तेंव्हा वधू-वरास शुभ आशिष देण्यास व राज्यस्तरीय मेळाव्याचे लाभ सर्वांना होण्यास समाजातील बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे वर्धा जिल्हा महिला व पुरुष पदाधिकारी तसेच संयोजक प्रांतीय कार्यकारिणी पदाधिकारी चंद्रशेखर कोटेवार प्रांतीय अध्यक्ष, आनंदराव अंगलवार प्रांतीय कार्याध्यक्ष, रवींद्र बंडीवार प्रांतीय सचिव, सर्व उपाध्यक्ष अरविंद गांगुलवार, संजय कोट्टेवार, प्रा.राजेंद्र कात्रटवार, राजेश भंडारवार, विनायक वद्देवार तसेच सर्व जिल्हा प्रमुख सुधीर ताटेवार वर्धा, प्रमोद एडलावार चंद्रपूर, किष्टना मुत्यालवार यवतमाळ, अण्णाजी गुंडलवार नागपुर, प्रकाश शंखदरवार गडचिरोली, मनिष कन्नमवार, सचिन चलकलवार, अविनाश अंकलवार, छबन पुप्पलवार आनंद कार्लेकर, रुचाताई आडपेवार, चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षा श्रद्धा एडलवार, साक्षी कार्लेकर चंद्रपूर इत्यादींनी एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top