Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विठ्ठल मंदिराचा 38 वा स्थापना दिन उत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विठ्ठल मंदिराचा 38 वा स्थापना दिन उत्सव साजरा मंदिरात मागील सात दिवसापासून ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचनचाची सांगता धनराजसिंह शेखावत - आमचा वि...

  • विठ्ठल मंदिराचा 38 वा स्थापना दिन उत्सव साजरा
  • मंदिरात मागील सात दिवसापासून ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचनचाची सांगता
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
स्व. श्रीमती सरुबाई शिवराम गाडे यांनी बांधलेल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा अडतीसवा स्थापना दिन उत्सव अक्षय तृतीयेला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
गडचांदूर येथे विठ्ठल मंदिरात मागील सात दिवसापासून ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचनचा कार्यक्रम आयोजित केला होता. दररोज ह. भ. प. दिपक महाराज पुरी, भाऊराव पाटील एकरे, मामिलवाड गुरुजी, पिंपळशेंडे गुरुजी, इत्यादींनी ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन केले. अक्षय तृतीयेला समारोपीय कार्यक्रमात सकाळी परिसर स्वच्छता, विधिवत काकड आरती, अभिषेक पूजा, दुपारी पारायण समाप्ती, हरिपाठ व धुपाराती, भजन व रात्रोला 
ह भ प श्री म्हसे महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिवती तालुक्यातील नारपठार, हिरापूर, खडकी, शेणगाव , लांबोरी इत्यादी गावातील वारकरी संप्रदायाचे भजन मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. हरी जागर करून भाविक भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. या प्रसंगी दिपक महाराज पुरी,  वासुदेव पाटील गोरे, माजी जि. प. सभापती अरुणभाऊ निमजे, भाऊराव पाटील एकरे, डॉ. माधवराव केंद्रे, डॉ. गंगाधर मामडगे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन भारती, अशोक एकरे, बंडूजी पिदूरकर, विठ्ठल चौधरी, संजय मेंढी, बिरबलजी बहोती, विठ्ठल पुरी, निखिल एकरे, मेघराज एकरे, अनंता खोके, दिगंबर गिरी यांचेसह महाप्रसाद करिता नगरसेविका मिनाक्षीताई एकरे, प्रा. संगीता पुरी, बयनाबाई खोके, राईबाई एकरे, सातभाई मॅडम, आरती गिरी, कांताबाई पुरी, शकुंतलाबाई इत्यादींचे सहकार्य लाभले. 
या प्रसंगी विठ्ठल मंदिर संस्थेचे सचिव उद्धव पुरी यांनी लोकसहभागातून या पुरातन विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराच्या जागेत भाविकांसाठी भव्य सर्व सोईयुक्त भक्तनिवास, भव्य सभामंडप व हॉल, तसेच निसर्गरम्य पहाडाच्या पायथ्याला लागून असलेल्या शेतात स्व. सरुबाई गाडे स्मृतिप्रीत्यर्थ जनतेला प्रदूषण मुक्त वातावरनात विरंगुळा घेता यावा या करिता कृषी पर्यटन सुरू करून व विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाला उत्पन्न सुरू करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. त्यासाठी जनतेनी तन, मन व धनाने सहकार्य करण्याचे नम्र आवाहन केले व सर्वांचे आभार मानले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top