- भाजपचा कार्यकर्ता हा सेवा व समर्पणाच्या भावनेने काम करणारा - डॉ.मंगेश गुलवाडे
- भाजपा महानगर सचिव चंदन पाल यांच्या पुढाकाराने बंगाली कॅम्प येथे पाणपोई चे लोकार्पण
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर हे भारतातील सर्वाधिक उष्ण तापमान असणारे शहर म्हणून ओळखले जाते येथील उच्च तापमानाची तीव्रता बघता विविध सामाजिक संस्था पुढाकार घेऊन नागरिकांसाठी विविध उपाययोजना तापमाना पासून सुरक्षितते साठी करीत असतात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची पाणपोई निर्माण करण्याचा हा होय या उपक्रमासाठी महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा महानगर सचिव चंदन पाल यांनी पुढाकार घेऊन 1 मे ला कामगार व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बंगाली कॅम्प येथे नागरिकांसाठी पाणपोई सुरू केली त्याचे लोकार्पण भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमीच सेवा व समर्पणाच्या भावनेने कार्य करतो व नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतो असे त्यांनी यावेळी सांगितले सदर पाणपोई च्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, सचिव रामकुमार आकेपेल्लीवार, राकेश बोमनवार, अमित निरंजने, मनीष खापरे, विक्की मेश्राम, संजय वाणी, आशुतोष रॉय, प्रशांत बोबडे, अनुप देबनाथ, राजु अंजदगलवार, मंगेश कौसुरकर, राज सोनूला, मनतोष रॉय, निलेश वाणी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.