Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अखेर मनपाच्या लेबर पेमेंट घोटाळ्याची चौकशी सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अखेर मनपाच्या लेबर पेमेंट घोटाळ्याची चौकशी सुरू ॲडव्हान्स कपात तातडीने बंद करण्याचे निर्देश शेकडो कामगारांना दिलासा मिळणार डी. एस. ख्वाजा - ...

  • अखेर मनपाच्या लेबर पेमेंट घोटाळ्याची चौकशी सुरू
  • ॲडव्हान्स कपात तातडीने बंद करण्याचे निर्देश
  • शेकडो कामगारांना दिलासा मिळणार
डी. एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शहर महानगरपालिकेच्या सर्वच विभागातील कंत्राटी कामगारांच्या खात्यातून ॲडव्हान्सच्या नावाखाली दरमहा हजारो रुपयांची कपात करून लेबर पेमेंट घोटाळा होत असल्याचा प्रकार जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी उघडकीस आणला होता. त्यासंदर्भातील पुरावे स्थायी समितीमध्ये सादर केले होते. तसेच याबाबतची तक्रार देशमुख यांनी जिल्हाधिकारी तसेच उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत या घोटाळ्याची चौकशी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी सुरू केली आहे.
सोमवारी या प्रकरणाची पहिली सुनावणी सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती जा.मा. भोईटे यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी कामगार विभागाचे एस.डब्लू.पारधी, महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. अमोल शेळके, संतोष गर्गेलवार, कनिष्ठ अभियंता अमित फुलझेले, सोनू थूल, कंत्राटदार विरेंद्र सिंह उपस्थित होते. प्रत्येक महिन्याला शेकडो कामगारांच्या खात्यातून ॲडव्हान्सच्या नावाखाली विशिष्ट रक्कम कपात करणे चुकीचे असल्याने ही कपात तातडीने बंद करण्यात यावी, असे निर्देश साहाय्यक कामगार आयुक्त यांनी मनपाच्या प्रतिनिधींना दिले. सोबतच सर्वच विभागातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबत व त्यांनी घेतलेल्या ऍडव्हान्स बाबत अहवाल देण्याचे निर्देश  मनपाला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जून रोजी घेण्यात येणार आहे. मात्र ॲडव्हान्सची कपात बंद होणार असल्याने महानगरपालिकेतील शेकडो कंत्राटी कामगारांना तातडीने दिलासा मिळणार आहे. 
ॲडव्हान्सच्या नावाखाली दर महिन्याला पगारातून कपात करणारे कंत्राटदार व यासाठी दोषी अधिकारी यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे केलेली आहे. त्यामुळे आता कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top