Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आगीत तीन घरे जळून भस्मसात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आगीत तीन घरे जळून भस्मसात आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा येथे शॉर्ट शर्किटमुळे आग लागून तीन घ...

  • आगीत तीन घरे जळून भस्मसात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा येथे शॉर्ट शर्किटमुळे आग लागून तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत घरे भस्मसात झाल्याने ठाकूर कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. चेक लिखितवाडा येथील बाबुराव ठाकूर, सुभाष बाबुराव ठाकूर, अमित बाबुराव ठाकूर या तीन कुटुंबियांचे घर आजूबाजूला आहे. आज दुपारी असून अचानक शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याने घरे जळून भासमसात भस्मसात झाली. 
या कुटुंबियांचे या आगीत अंदाजे १० क्विंटल धान, जीवनावश्यक वस्तू सह ८० हजार रुपये रोख रक्कम व घरातील इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान गावातील नागरिकांनी एकत्र येत आग नियंत्रणात आणली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे वाहन देखील पोहचले. यावेळी तहसीलदार के.डी. मेश्राम, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, ठाणेदार जीवन राजगुरु कुटूबियांची घेवून सांत्वन केले. पुढील तपास ठाणेदार राजगुर करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top