- बल्लारपुर तालुक्यातील येनबोड़ी ते मनोरा रोड चे नुतनीकरन लवकर करा
- मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांची निवेदनाद्वारे मागणी
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपुर -
बल्लारपुर तालुक्यातील येनबोडी-किन्ही ते मानोरा हा रोड जड वाहतुकी ने खराब झालेला असुन रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे. यामुळे या रस्त्यावरून येजा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यामुळे कधी काळी मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे आजपर्यंत कुणाचेच लक्ष नसल्याने नागरीक अशा रस्त्याअभावी त्रस्त झाले असुन सबंधीत विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन येनबोड़ी-किन्ही मानोरा या मुख्य मार्गाचे नुतनीकरन या सात दिवसाच्या आत करावे अन्यथा मनसेकडून मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल आणी याला जबाबदार संबधीत प्रशासन असेल अश्या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाअध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात मनसे जिल्हासचिव बल्लारपूर विधानसभा किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रपुर यांना याना देण्यात आले. मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रपुर यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या नुतनीकरणास लवकर सुरवात करण्यास तेथील ठेकेदारांना सांगितले. रस्त्याचे काम लवकर सुरु न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला. निवेदन देते वेळी जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, चंद्रपुर तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, बल्लारपूर तालुका महिला सेना अध्यक्ष कल्पना पोतर्लावार, क्रिष्णा गुप्ता, मनोज तांबेकर, वाणी सदालावार, पियुश दुपारे, सुयोग घुवलकर, राज वर्मा, सचिन बाळस्कर, महेश गडपेल्लीवार, अनुरोज रायपुरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.