Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आर्ट ऑफ लिव्हींग चे प्रणेते श्री श्री रविशंकर जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आर्ट ऑफ लिव्हींग चे प्रणेते श्री श्री रविशंकर जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - विश्वगुर...

  • आर्ट ऑफ लिव्हींग चे प्रणेते श्री श्री रविशंकर जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
विश्वगुरु आणि आर्ट ऑफ लिव्हींग चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचे शुकवार दि. 13 मे 2022 रोजी चंद्रपूर शाखे तर्फे वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यत चिन्मय मिशन हॉल आकाशवाणी रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'ब्लड डोनर्स' सेल्फी विथ द व्हीआयपी' या संकल्पने अंतर्गत रक्तदात्यांना निमंत्रित व्हीआयपी सोबत सेल्फी तथा त्यांच्याच हस्ते वृक्षारोपण करताना सुद्धा सेल्फी काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाला माजी महापौर सौ.राखी कंचर्लावार या आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. तसेच संध्याकाळी 6 वाजेपासून 'जेष्ठ नागरिक संघ' रामनगर येथे 'गुरुपुजा, आयुश होम, भजन संध्या आणि प्रसाद वितरण चे आयोजन करण्यात आलेले आहे. निरामय आरोग्य उदंड आयुष्य, सुख, शांती आणि संपत्तीचे सर्वसमावेषक फळ देणाऱ्या आणि चंद्रपूरात पहिल्यांदाच संपन्न होणाऱ्या आयुष होम यज्ञाचे भव्य आयोजन 130 जोडपे अथवा व्यक्तींच्या संकल्पाने साजरा होणार आहे. होमाच्या संकल्पनासाठी अथवा यजमानपद स्विकारण्यासाठी राजेश सज्जनवार यांचे भ्रमणध्वनीं 942345668 वर संपर्क साधण्याचे आवाहन ए.ओ.एल चे जिल्हा शिक्षक समन्वयक मिलींद गंपावार 9420867743 यांनी केले आहे.
प्रसिद्ध गायक शाम झाडे हे भजन संध्या सादर करणार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून 12 मे ला श्री भालचंद्र मेडीकल पठाणपूरा येथे 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत नाडीपरीक्षा हि आयोजित करण्यात आलेली आहे तरी श्री च्या चाहत्यांनी सर्व आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top