Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "पुष्पगंध" काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा १६ मे रोजी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"पुष्पगंध" काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा  १६ मे रोजी नव कवी दौलत शामराव खानेकर यांचे कल्पना विलासातून साकार झालेल्या काव्यसंग्रह ...

  • "पुष्पगंध" काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा १६ मे रोजी
नव कवी दौलत शामराव खानेकर यांचे कल्पना विलासातून साकार झालेल्या काव्यसंग्रह "पुष्पगंध" चा प्रकाशन सोहळा दि. १६ मे २०२२ सायंकाळी ६ वाजता श्रावणी सेलिब्रेशन हॉल, खांबाडा, तह. वरोरा जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला  आहे. सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था चालक महामंडळ नागपूर विभागाचे अध्यक्ष व महिला महाविद्यालय बल्लारपूर चे प्राचार्य डॉ. अनिल शिंदे, प्रमुख अतिथी प्रसिद्ध नेत्र तज्ञ नागपूर तथा राज्यसभा खासदार  पद्मश्री डॉ. विकास महात्मे, चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नाक, कान, घसा तज्ञ तथा धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, शाहिद जा.ति.जि.प.क. महाविद्यालय गोरेगाव जि. गोंदिया चे प्राचार्य तथा कवी, लेखक, साहित्यिक डॉ. प्रभाकर लोंढे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर सिनेट सदस्य वामनराव तुरके या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
मराठी काव्याचे सुज्ञ जाणकार रसिकांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नव काव्यसंग्रहाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top