Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची धाड ; लाखोंचा मुद्देमाल केला जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची धाड लाखोंचा मुद्देमाल केला जप्त  चार आरोपींना अटक डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी वणी - चिखलगांव येथील एका...

  • क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची धाड
  • लाखोंचा मुद्देमाल केला जप्त 
  • चार आरोपींना अटक
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वणी -
चिखलगांव येथील एका वसाहतीमध्ये भाड्याच्या घरात सुरु असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर १० मे मंगळवारच्या रात्री पोलिसांनी धाड टाकून क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यवतमाळ पोलिसांनी वणी येथील मटक्यावर टाकलेल्या धाडीनंतर, शहर पोलिस यंत्रणा ॲक्टीव्ह मोड मध्ये आल्येचे दिसुन येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरालगत लगत असलेल्या चिखलगांव येथील खुराणा ले-आऊट मधील एका किरायाच्या रूम मध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतला जात असल्याची गोपनीय माहीती पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांना मिळाली. ठाणेदारांनी सपोनि प्रवीण हिरे यांच्यासह पोलिस पथक तयार करून खुराणा ले-आऊट मधील सट्टा सुरु असलेल्या  घराजवळ सापळा रचला आणी घराच्या खिडकीतून डोकावून पहिले असता त्या ठिकाणी काही इसम आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेतांना आढळले. पोलिसांनी रूम मध्ये प्रवेश करून आयपीएल क्रिकेट सट्ट्याची ऑनलाईन उतारवाडी घेणाऱ्या चार आरोपींना रंगेहाथ अटक केली.
काल १० मे मंगळवारला लखनऊ सुपर जॉईंट विरुद्ध गुजरात टायटन्स या संघादरम्यान सामना होता. या सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदारांना मिळाली. ठाणेदारांनी पोलीस पथकासह रात्री उशिरा खुराणा ले-आऊट मधील क्रिकेट सट्टा सुरु असलेल्या त्या किरायाच्या रूमवर धाड टाकली. त्या ठिकाणी काही ईसम क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेतांना आढळून आले. सट्ट्याची उतारवाडी घेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप नारायण देवगडे वय ३४ रा. चिखलगांव, सौरभ राजेंद्र मिश्रा वय २८ रा. वरोरा, शिवदास संभाजी तडस रा. वरोरा, अब्दुल छनील अब्दुल वाहिद शेख वय ३५ रा. सुराणा ले-आऊट वणी यांचा समावेश असून त्यांच्यावर कलम ४,५ व सहकलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर क्रिकेट सट्टा सांभाळणारा सुधीर चिंचोलकर वय ४० रा. शास्त्रीनगर हा पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आला नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी ८८ हजार रोख रक्कमेसह एक बुलेरो वाहन, दुचाक्या, मोबाईल, सट्टा उतरविण्याची सामुग्री असा एकूण ८ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढिल तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रवीण हिरे व सपोनि माया चाटसे करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top