धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महाबोधी बहु.बौध्द मंडळ थुटरा च्या वतीने थुटरा या ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक राहुल उमरे होते व प्रमुख पाहुणे म्हणून महाबोधी बहु. मंडळाचे अध्यक्ष वामनराव भिवापूरे, उपाध्यक्ष विजय चूनारकर, जगदीश धवणे व सचिव नितेश रामटेके व मंडळातील सर्व सदस्य व समस्त गावकरी उपस्थित होते. शिबिरात 50 नागरिकांनी रक्तदान केले. याप्रसंगी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.