विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
बामनवाडा येथील ललिता ताराचंद्र टाकभौरे (करमनकर) या सामान्य कुटुंबातील मुलीने संसाराचा गाडा हाकलत अभ्यास-जिद्द व चिकाटीच्या जोरावर न्यायाधीशची परीक्षा उतीर्ण केली आहे. याबद्दल आज शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी तीच्या घरी जाऊन सत्कार केला.
नुकतीच न्यायाधीश पदाची परीक्षा ललिता टाकभौरे (करमनकर) हीने अत्यंत कठीण परस्थितीतून परिश्रमपूर्वक उत्तीर्ण केली आहे. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात एलएलएम मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. ही बाब राजुरा भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिने न्यायाधीश पदाच्या परीक्षेत राज्यातून १३ वी रँक मिळवित परीक्षा उतीर्ण केली आहे.
तीच्या या यशाबद्दल शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिनांक 14 एप्रिल ला सकाळी घरी जाऊन ललिताचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बंडू देठे, कपिल इद्दे, दिलीप देठे, माजी नगरसेवक मधुकर चिंचोळकर, दिलीप देरकर व भाऊजी कंनाके, पुंडलिक वाढई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.