Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथील पुरातन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर येथील पुरातन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवचे आयोजन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - शहरातील मध्यभागी असलेल्या ...

  • गडचांदूर येथील पुरातन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवचे आयोजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
शहरातील मध्यभागी असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा  येत्या शनिवारी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहेत. हनुमान जन्मोत्सव दिनी आयोजित कार्यक्रमात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे. भजन, कीर्तन, हनुमान चालीसा, पठण, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील भाविक भक्तांनी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शहरात व परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात सुद्धा शनिवारी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top